Privacy Policy & Terms and conditions

गझल मंथन साहित्य संस्था

नियमावली

१. गझल मंथन हे ॲप गझल आणि गझल संबंधित साहित्यासाठी बनवले असून, गझल साहित्याव्यतिरिक्त इतर साहित्य, टिप्पणी, टिका पोस्ट करण्यास मज्जाव आहे.

२. अॕपवर नोंदणी असलेल्या कोणत्याही सदस्यांना वैयक्तिक मेसेज करू नयेत.

३. कोणत्याही महिला सदस्यांना वैयक्तिक मेसेज करू नयेत. तसे आढळून आल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल..

४. कुठलेही फॉरवर्ड किंवा सुप्रभातचे मेसेज नकोत. तसे केल्यास त्या वापरकर्त्याला ब्लाॅक करण्यात येईल..

५. अॕप वर गझलेव्यतिरिक्त वायफळ चर्चा, वादविवाद करू नयेत.

६ वादग्रस्त पोस्टस् डिलिट केल्या जातील

७. प्रशासनाकडून केलेल्या पोस्टस् ह्या मान्यवरांकडून तपासून पोस्ट केलेल्या असतात. त्यावर उगाच टिकात्मक लिहून स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून नये.

८. प्रत्येक महिन्याचे उपक्रम प्रसिद्ध केले जातील, त्याची नियमावली स्वतंत्र दिली जाते, त्याचे पालन करावे.

९. आजीव सदस्यत्व म्हणजे कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व नसून कुठलाही स्वतंत्र उपक्रम करावयाचा असल्यास कार्यकारी समिती कडून मान्यता घ्यावी.

१०. परीक्षक/मार्गदर्शक हे समितीने नेमून दिलेल्या अधिकाराने मार्गदर्शन करत असतील, त्यांच्या प्रतिक्रियेवर प्रश्न उपस्थित करून वातावरण बिघडवू नये.

११. मार्गदर्शकांना आपले प्रश्न जरूर विचारावेत पण कोणीही मार्गदर्शकांचा अपमान होईल असे वागू नये.

१२. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी अॕपवरील गझलकारांनी पोस्ट केलेल्या गझल रचनांना अवश्य दाद द्यावी.

१३. कुठलीही जातिवाचक, राजकीय वा समाजात तेढ निर्माण करणारी रचना वा त्या संदर्भात भाष्य नको.

१४. अॕपवर लिहिलेल्या किंवा वारंवार प्रसिद्ध केलेल्या, किंवा ॲपवरून प्रसिद्ध झालेल्या किंवा अलिखीत परंतू आवश्यक अशा सर्व नियमांचे उल्लंघन किंवा गैरवर्तन करणाऱ्याला आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

१५. कायदेशीर बाबी ह्या कोपरना, जि. चंद्रपूर न्यायालया अंतर्गत असेल,त्याबद्दल येण्याजाण्याचा, रहाण्याचा खर्च आणि अन्य इतर सगळे खर्च हे स्वतःचे स्वतः करावा लागेल, त्यास समिती जबाबदार असणार नाही

१६. येथे केलेल्या पोस्टची जबाबदारी ही लेखकाची असेल, त्यावर झालेली टिका, आरोप, न्यायालयीन प्रक्रियेशी संस्था जबाबदार नसेल.

१७. ह्या ॲपची निर्मिती ही लेखकाला सकारात्मक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी झाली आहे. त्यातून फक्त सकारात्मकता अपेक्षित असून कोणी त्याचा गैरवापर किंवा नकारात्मकता पसरवण्यासाठी केल्याचे आढळल्यास त्या व्यक्ती, समूहा विरोधात कायद्यानुसार ताकीद दिली जाईल. तसेच असेपर्यंत वारंवार झाल्याचे आढळल्यास संस्था आपल्या मर्जीनुसार कायदेशीर कार्यवाही करेल.

१८. वरिल उपरोक्त नियमावलीमधे आवश्यक त्या सुधारणा, संख्येत वाढ किंवा कमी करण्याचे अधिकार संस्थेकडे अबाधित आहेत.

आपली स्नेहाभिलाषी गझल मंथन साहित्य संस्था